Songtexte.com Drucklogo

Vithal To Aala Aala Songtext
von Lata Mangeshkar

Vithal To Aala Aala Songtext

विठ्ठल तो आला-आला, मला भेटण्याला
विठ्ठल तो आला-आला, मला भेटण्याला
मला भेटण्याला आला, मला भेटण्याला
विठ्ठल तो आला-आला, मला भेटण्याला

तुळशीमाळ घालुनि गळा कधी नाही कुठले टाळ
तुळशीमाळ घालुनि गळा कधी नाही कुठले टाळ
पंढरीला नाही गेले चुकूनिया एक वेळ
पंढरीला नाही गेले चुकूनिया एक वेळ


दिव्हाऱ्यात माझे देव ज्यांनी केला प्रतिपाळ
दिव्हाऱ्यात माझे देव ज्यांनी केला प्रतिपाळ
चरणांची त्यांच्या धूळ...
चरणांची त्यांच्या धूळ रोज लावी कपाळाला
विठ्ठल तो आला-आला, मला भेटण्याला

सत्य वाचा माझी होती, वाचली न गाथा-पोथी
सत्य वाचा माझी होती, वाचली न गाथा-पोथी
घाली पाणी तुळशीला आगळीच माझी भक्ती
घाली पाणी तुळशीला आगळीच माझी भक्ती

शिकवण मनाची ती बंधुभाव सर्वांभूती
शिकवण मनाची ती बंधुभाव सर्वांभूती
विसरून धर्म, जाती...
विसरून धर्म, जाती देई घास भुकेल्याला

विठ्ठल तो आला-आला, मला भेटण्याला
विठ्ठल तो आला-आला, मला भेटण्याला
मला भेटण्याला आला, मला भेटण्याला
विठ्ठल तो आला-आला, मला भेटण्याला

Songtext kommentieren

Log dich ein um einen Eintrag zu schreiben.
Schreibe den ersten Kommentar!

Fans

»Vithal To Aala Aala« gefällt bisher niemandem.