Songtexte.com Drucklogo

Kon Duja Aadhar Songtext
von Lata Mangeshkar

Kon Duja Aadhar Songtext

कोण दुजा आधार तुजविण?
तुजविण कोण दुजा आधार?
कोण दुजा आधार?

अवती-भवती पहा दाटला
अवसेचा अंधार
काजळले नभ, काजळले मन
काजळले नभ, काजळले मन

व्याकुळले मी फार
कोण दुजा आधार तुजविण?
कोण दुजा आधार?


वादळ-वारा झोंबत अंगा
वादळ-वारा झोंबत अंगा
झिंगुनी हा अनिवार

पदराखाली इवली-दिवली
थरथरते हळुवार
कोण दुजा आधार?

कशी सावरू, कुठे निवारा?
घालू कुणावर भार?
कशी सावरू, कुठे निवारा?
घालू कुणावर भार?

पतीतपावना एक तुझे मज
पतीतपावना एक तुझे मज
उघडे आता दार
कोण दुजा आधार

Songtext kommentieren

Log dich ein um einen Eintrag zu schreiben.
Schreibe den ersten Kommentar!

Fans

»Kon Duja Aadhar« gefällt bisher niemandem.