Songtexte.com Drucklogo

Nach Re Mora Songtext
von Asha Bhosle

Nach Re Mora Songtext

नाच रे मोरा, आंब्याच्या वनात
नाच रे मोरा, नाच
नाच रे मोरा, आंब्याच्या वनात
नाच रे मोरा, नाच

ढगांशी वारा झुंजला रे
काळा-काळा कापूस पिंजला रे
आता तुझी पाळी, वीज देते टाळी
आता तुझी पाळी, वीज देते टाळी

फुलव पिसारा नाच
नाच रे मोरा, आंब्याच्या वनात
नाच रे मोरा, नाच
नाच रे मोरा, आंब्याच्या वनात
नाच रे मोरा, नाच

झरझर धार झरली रे
झाडांची भिजली इरली रे
पावसात न्हाऊ, काहीतरी गाऊ
पावसात न्हाऊ, काहीतरी गाऊ


करुन पुकारा नाच
नाच रे मोरा, आंब्याच्या वनात
नाच रे मोरा, नाच
नाच रे मोरा, आंब्याच्या वनात
नाच रे मोरा, नाच

थेंब-थेंब तळ्यात नाचती रे
टपटप पानांत वाजती रे
पावसाच्या रेघात, खेळ खेळू दोघात
पावसाच्या रेघात, खेळ खेळू दोघात

निळ्या सवंगड्या नाच
नाच रे मोरा, आंब्याच्या वनात
नाच रे मोरा, नाच
नाच रे मोरा, आंब्याच्या वनात
नाच रे मोरा, नाच

पावसाची रिमझिम थांबली रे
तुझी-माझी जोडी जमली रे
पावसाची रिमझिम थांबली रे
तुझी-माझी जोडी जमली रे

आभाळात छान-छान सात रंगी कमान
कमानीखाली त्या नाच

नाच रे मोरा, आंब्याच्या वनात
नाच रे मोरा, नाच
नाच रे मोरा, आंब्याच्या वनात
नाच रे मोरा, नाच

Songtext kommentieren

Log dich ein um einen Eintrag zu schreiben.
Schreibe den ersten Kommentar!

Quiz
Cro nimmt es meistens ...?

Fans

»Nach Re Mora« gefällt bisher niemandem.