Songtexte.com Drucklogo

Aaj Anandi Anand Zala Songtext
von Asha Bhosle

Aaj Anandi Anand Zala Songtext

किती सांगू, मी सांगू कुणाला?
किती सांगू, मी सांगू कुणाला?
आज आनंदी आनंद झाला
आज आनंदी आनंद झाला

रास खेळू चला, रंग उधळू चला
आला-आला गं कान्हा आला
रास खेळू चला, रंग उधळू चला
आला-आला गं कान्हा आला

किती सांगू, मी सांगू कुणाला?
आज आनंदी आनंद झाला
आज आनंदी आनंद झाला

अष्टमिच्या राती गं, यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले
गोड हसू गालांत, नाचू-गाऊ तालात, पैंजण थरथरले
अष्टमिच्या राती गं, यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले
गोड हसू गालांत, नाचू-गाऊ तालात, पैंजण थरथरले

कान्हा दिसतो उठून, गोपी आल्या नटून
कान्हा दिसतो उठून, गोपी आल्या नटून
नव्या नवतीचा शृंगार केला


आज आनंदी आनंद झाला
आज आनंदी आनंद झाला
किती सांगू, मी सांगू कुणाला?
आज आनंदी आनंद झाला
आज आनंदी आनंद झाला

रास खेळू चला, रंग उधळू चला
आला-आला गं कान्हा आला
किती सांगू, मी सांगू कुणाला?
किती सांगू, मी सांगू कुणाला?
आज आनंदी आनंद झाला
आज आनंदी आनंद झाला

मूर्ति अशी साजिरी गं, ओठांवरी बासरी भुलले सुरांसंगती
कुणी म्हणा "गोविंद," कुणी म्हणा "गोपाळ," कान्हाला नावे किती
मूर्ति अशी साजिरी गं, ओठांवरी बासरी भुलले सुरांसंगती
कुणी म्हणा "गोविंद," कुणी म्हणा "गोपाळ," कान्हाला नावे किती

रोज खोड्या करुन, गोप बाळे जमून
रोज खोड्या करुन, गोप बाळे जमून
सांज-सकाळी गोपाळ काला

आज आनंदी आनंद झाला
आज आनंदी आनंद झाला
किती सांगू, मी सांगू कुणाला?
आज आनंदी आनंद झाला
आज आनंदी आनंद झाला


खेळ असा रंगला गं खेळणारा दंगला
खेळ असा रंगला गं खेळणारा दंगला, टिपरीवर टिपरी पडे
लपुन-छपुन गिरिधारी मारतो गं पिचकारी, रंगांचे पडती सडे

फेर धरती दिशा, धुंद झाली निशा
फेर धरती दिशा, धुंद झाली निशा
रास रंगांच्या धारांत न्हाला

आज आनंदी आनंद झाला
आज आनंदी आनंद झाला
किती सांगू, मी सांगू कुणाला?
आज आनंदी आनंद झाला
आज आनंदी आनंद झाला

Songtext kommentieren

Log dich ein um einen Eintrag zu schreiben.
Schreibe den ersten Kommentar!

Fans

»Aaj Anandi Anand Zala« gefällt bisher niemandem.