Songtexte.com Drucklogo

Hawas Maj Tu Songtext
von Asha Bhosle

Hawas Maj Tu Songtext

हवास तू, हवास तू
हवास मज तू, हवास तू, हवास तू
प्रिया नाचते आनंदाने
दूर उभा का उदास तू? हवास तू

मदनासम हे रुप देखणे
शब्दाविण हे मुक्त बोलणे
तुझ्यापुढे मज गगन ठेंगणे
ज्योती मी अन प्रकाश तू, प्रकाश तू

हवास तू, हवास तू
हवास मज तू, हवास तू, हवास तू


या तेजस्वी डोळ्यांमधुनी
भर दिवसा हो रात्र चांदणी
मुखचंद्राच्या कला-कलांनी
हासविणारा सुहास तू, सुहास तू

हवास तू, हवास तू
हवास मज तू, हवास तू, हवास तू

तारुण्याच्या झाडावरती
मोहक होऊनी बसली प्रीती
या प्रीतीच्या पूर्तीसाठी
करशील का रे प्रयास तू, प्रयास तू?

हवास तू, हवास तू
हवास मज तू, हवास तू, हवास तू
प्रिया नाचते आनंदाने
दूर उभा का उदास तू? हवास तू
हवास तू, हवास तू

Songtext kommentieren

Log dich ein um einen Eintrag zu schreiben.
Schreibe den ersten Kommentar!

Quiz
Wer besingt den „Summer of '69“?

Fans

»Hawas Maj Tu« gefällt bisher niemandem.