Songtexte.com Drucklogo

Aali Majhya Ghari Hi Diwali Songtext
von Anuradha Paudwal

Aali Majhya Ghari Hi Diwali Songtext

आली माझ्या घरी ही दिवाळी
आली माझ्या घरी ही दिवाळी
सप्तरंगात न्हाऊन आली
सप्तरंगात न्हाऊन आली
आली माझ्या घरी ही दिवाळी
आली माझ्या घरी ही दिवाळी

मंद चांदणे, धुंद श्वास हा, मी तर त्यात भिजावे
मंद चांदणे, धुंद श्वास हा, मी तर त्यात भिजावे
जन्म-जन्म रे तुझ्या संगती एकरुप मी व्हावे
प्रीत नयनी वसे, लाज गाली हसे
प्रीत नयनी वसे, लाज गाली हसे
आ, कोर चंद्राची खुलते भाळी
आली माझ्या घरी ही दिवाळी
आली माझ्या घरी ही दिवाळी


पाऊल पडता घरी मुकुंदा, गोकुळ हरपून गेले
उटी लाविता अंगी देवा, सुगंध बरसत आले
हर्ष दाटे उरी, नाथ आले घरी
हर्ष दाटे उरी, नाथ आले घरी
आ, सूर उधळीत आली भूपाळी
आली माझ्या घरी ही दिवाळी
आली माझ्या घरी ही दिवाळी

नक्षत्रांचा साज लेऊनी रात्र अंगणी आली
नक्षत्रांचा साज लेऊनी रात्र अंगणी आली
दीप उजळले नयनी माझ्या, ही तर दीपावली
संग होता हरी, जाहले बावरी
संग होता हरी, जाहले बावरी
आ, मी अभिसारीका ही निराळी
आली माझ्या घरी ही दिवाळी
आली माझ्या घरी ही दिवाळी
सप्तरंगात न्हाऊन आली
आली माझ्या घरी ही दिवाळी
आली माझ्या घरी ही दिवाळी

Songtext kommentieren

Log dich ein um einen Eintrag zu schreiben.
Schreibe den ersten Kommentar!

Fans

»Aali Majhya Ghari Hi Diwali« gefällt bisher niemandem.