Songtexte.com Drucklogo

Naka Todu Pavhana Jara Thamba Songtext
von Usha Mangeshkar

Naka Todu Pavhana Jara Thamba Songtext

डेरेदार
बहरलं झाडं
लागला पाड
पानाच्या आड खुणवतो आंबा
खुणवतो आंबा

नका तोडू पाव्हणं जरा थांबा
नका तोडू पाव्हणं जरा थांबा, हो
नका तोडू पाव्हणं जरा थांबा

(अहो टोपीवालं तुम्ही फेटेवालं)
(अहो टोपीवालं तुम्ही फेटेवालं)
(टकमक टकमक बघू नका हो)
(मागं मागं लागू नका)
(टकमक टकमक बघू नका हो)
(मागं मागं लागू नका)

भलत्याच गोष्टी करू नका
नका तोडू पाव्हणं जरा थांबा


वान अस्सल तांबूस पिवळा
टचटचून रसानं भरला, हो
वान अस्सल तांबूस पिवळा
टचटचून रसानं भरला

हिरवट गोडी
आंबट थोडी
सालीत मऊमऊ गाभा

नका तोडू पाव्हणं जरा थांबा

भार देठाला सोसत न्हाई
आली झुळुक हेलकावा खाई
भार देठाला सोसत न्हाई
आली झुळुक हेलकावा खाई
नजरा सावरा
थोडक्यात आवरा

कईकांनी धरला दबा

नका तोडू पाव्हणं जरा थांबा
नका तोडू पाव्हणं जरा थांबा, हो
नका तोडू पाव्हणं जरा थांबा
जरा थांबा, थोडं थांबा, थांबा, थांबा, थांबा
अहो, नका तोडू पाव्हणं जरा थांबा
नका तोडू पाव्हणं जरा थांबा

Songtext kommentieren

Log dich ein um einen Eintrag zu schreiben.
Schreibe den ersten Kommentar!

Quiz
Wer ist kein deutscher Rapper?

Fans

»Naka Todu Pavhana Jara Thamba« gefällt bisher niemandem.