Songtexte.com Drucklogo

Dashratha Ghe He Payasdan Songtext
von Sudhir Phadke

Dashratha Ghe He Payasdan Songtext

दशरथांनी यज्ञअश्व सोडला
एका समस्तआनंद्र तो यज्ञअश्व परत आला
राजा दशरथाच्या विनंतीनुसार विश्वशैयांनी यज्ञ मांडला
आणि एका शुभवेळी त्या यज्ञ ज्वालेमधून एक रक्त महापुरुष निर्माण झाला

तो महापुरुष म्हणजे साक्षात अग्निदेव होता
आणि तो अग्निदेव आपल्या दुंदभी सारख्या कणखर
परंतु अतिशय मधुर अश्या सादाने दशरथाला सांगू लागला
"दशरथा, घे हें पायसदान"

दशरथा, दशरथा, घे हें पायसदान, पायसदान
दशरथा, घे हें पायसदान, पायसदान
तुझ्या यज्ञिं मी प्रगट जाहलो
तुझ्या यज्ञिं मी प्रगट जाहलो, हा माझा सन्मान
दशरथा, दशरथा, दशरथा, घे हें पायसदान, पायसदान


तव यज्ञाची होय सांगता
तृप्त जाहल्या सर्व देवता
तव यज्ञाची होय सांगता
तृप्त जाहल्या सर्व देवता
प्रसन्न झाले नृपा तुझ्यावर
प्रसन्न झाले नृपा तुझ्यावर श्रीविष्णू भगवान
दशरथा, दशरथा, दशरथा, घे हें पायसदान, पायसदान

श्रीविष्णूंची आज्ञा म्हणुनी
आलो मी हा प्रसाद घेउनि
श्रीविष्णूंची आज्ञा म्हणुनी
आलो मी हा प्रसाद घेउनि
या दानासी या दानाहुन
या दानासी या दानाहुन अन्य नसे उपमान
दशरथा, दशरथा, दशरथा, घे हें पायसदान, पायसदान

करांत घे ही सुवर्णस्थाली
दे राण्यांना क्षीर आतली
करांत घे ही सुवर्णस्थाली
दे राण्यांना क्षीर आतली
कामधेनुच्या दुग्धाहुनही
कामधेनुच्या दुग्धाहुनही ओज हिचे बलवान
दशरथा, दशरथा, दशरथा, घे हें पायसदान, पायसदान


राण्या करतिल पायसभक्षण
उदरीं होईल वंशारोपण
राण्या करतिल पायसभक्षण
उदरीं होईल वंशारोपण
त्यांच्या पोटीं जन्मा येतिल
त्यांच्या पोटीं जन्मा येतिल योद्धे चार महान
दशरथा, दशरथा, दशरथा, घे हें पायसदान, पायसदान

प्रसवतील त्या तीन्ही देवी
श्रीविष्णूंचे अंश मानवी
प्रसवतील त्या तीन्ही देवी
प्रसवतील त्या तीन्ही देवी
श्रीविष्णूंचे अंश मानवी
धन्य दशरथा तुला लाभला देवपित्याचा मान
दशरथा, दशरथा, दशरथा, घे हें पायसदान, पायसदान

कृतार्थ दिसती तुझी लोचनें
कृतार्थ मीही तुझ्या दर्शनें
कृतार्थ दिसती तुझी लोचनें

कृतार्थ दिसती
कृतार्थ दिसती तुझी लोचनें

कृतार्थ दिसती
कृतार्थ दिसती तुझी लोचनें
कृतार्थ मीही तुझ्या दर्शनें
दे आज्ञा मज नृपा
दे आज्ञा मज नृपा, पावतो यज्ञीं अंतर्धान
दशरथा, दशरथा, दशरथा, घे हें पायसदान, पायसदान
दशरथा

Songtext kommentieren

Log dich ein um einen Eintrag zu schreiben.
Schreibe den ersten Kommentar!

Quiz
Welche Band singt das Lied „Das Beste“?

Fans

»Dashratha Ghe He Payasdan« gefällt bisher niemandem.