Ashi Pankhare Yeti Songtext
von Sudhir Phadke
Ashi Pankhare Yeti Songtext
अशी पाखरे येती, आणिक स्मृति ठेवुनी जाती
दोन दिसांची रंगतसंगत, दोन दिसांची नाती ॥ ध्रु ॥
चंद्र कोवळा, पहिला वहिला, झाडामागे उभा राहिला
जरा लाजुनि, जाय उजळुनी, काळोखाच्या राती ॥ १ ॥
अशी पाखरे येती, आणिक स्मृति ठेवुनी जाती.
फुलून येता फुल बोलले, मी मरणावर हृदय तोलले
नव्हते नंतर, परी निरंतर, गंधित झाली माती ॥ २ ॥
अशी पाखरे येती, आणिक स्मृति ठेवुनी जाती
हात एक तो हळु थरथरला, पाठीवर मायेने फिरला
देवघरातिल समईमधुनी, अजून जळती वाती ॥ ३ ॥
अशी पाखरे येती, आणिक स्मृति ठेवुनी जाती
कुठे कुणाच्या घडल्या भेटी, गीत एक मोहरले ओठी
त्या जुळल्या हृदयांची गाथा, सूर अजुनही गाती ॥ ४ ॥
अशी पाखरे येती, आणिक स्मृति ठेवुनी जाती
दोन दिसांची रंगतसंगत, दोन दिसांची नाती.

Writer(s): Mangesh Padgaokar, Yashwant Deo Lyrics powered by www.musixmatch.com