He Gandhit Ware Firnare Songtext
von Saleel Kulkarni
He Gandhit Ware Firnare Songtext
हे गंधित वारे फिरणारे, घन झरझर उत्कट झरणारे

जरी परिचित सारे पूर्वीचे
तरी आता त्याही पलिकडचे
बघा मनात काही गजबजते
क्षणाक्षणाच्या दिव्यादिव्यातून अत्तर जळते रे
उमजत नाही ओढ कुणाची, सुखवित सलते रे

कुठल्या देशी नकळत माझे पाऊल पडले रे
सूर रोजचे कसे नव्याने मनास भिडले रे?
कुठल्या देशी नकळत माझे पाऊल पडले रे
सूर रोजचे कसे नव्याने मनास भिडले रे?
हे गीत जयाला पंखसुध्दा
अन हवाहवासा डंखसुध्दा
कधि शंकित अन निःशंकसुध्दा

मनात जे-जे दडून होते नकळत आकळते
कसे दुज्याच्या स्पर्शाने हे मी पण झगमगते?

ही जाणीव अवघी जरतारी
हर श्वासातुन परिमळणारी
हर गात्रातुन तगमगणारी

नाव न उरले, गाव न उरले, अवघे ओसरले
बेभानाचे भान जिण्याला बिलगुन बसलेले
नाव न उरले, गाव न उरले, अवघे ओसरले
बेभानाचे भान जिण्याला बिलगुन बसलेले
हा स्पर्श विजेच्या तारांचा
हा उत्सव बघ अस्वस्थाचा
हा जीव न उरला मोलाचा

(हे गंधित वारे फिरणारे, घन झरझर उत्कट झरणारे)

Writer(s): Salil Kulkarni Lyrics powered by www.musixmatch.com