Songtexte.com Drucklogo

Navri Ni Navryachi Swari Songtext
von Avadhoot Gupte & Vaishali Samant

Navri Ni Navryachi Swari Songtext

सनई संगे चढे चौघडा, डोईवरती पडती अक्षदा
मंगलाष्टके सुरात घुमती, फेरे पडती सात
लग्नमंडपी दोन जीवांची एक नवी सुरवात

नवरी नी नवऱ्याची स्वारी
नांदते संसारी घेऊन तलवारी, हा-हा
नवरी नी नवऱ्याची स्वारी
नांदते संसारी घेऊन तलवारी

आता फिरने ना, फिरने माघारी
करून तयारी वाजवा हो तुतारी

नवरी नी नवऱ्याची स्वारी
नांदते संसारी घेऊन तलवारी

हो, किती प्रेमाने चघाळले तरीही
चिंगमची साखर सरते
तशीच सरता नवी नवलाई
गोडी गुलाबी हवेत विरते


Romeo चा hitler होतो
Juliet सुरी तू धारी
Romeo चा hitler होतो
Juliet सुरी तू धारी
तू धारी सूरी, सूरी, सूरी, सूरी

आता फिरने...
आता फिरने ना, फिरने माघारी
करून तयारी वाजवा हो तुतारी

नवरी नी नवऱ्याची स्वारी
नांदते संसारी घेऊन तलवारी, हा-हा
नवरी नी नवऱ्याची स्वारी
नांदते संसारी घेऊन तलवारी

हो, चकमक ही घनघोर पेटता
ती आपुले ब्रह्मस्त्र सोडते
बघून तिच्या डोळ्यातील पाणी
त्याचे तर अवसानचं गळते

युद्ध संपते, मिठीत उरते साखर विरघळणारी
युद्ध संपते, मिठीत उरते साखर विरघळणारी
आता फिरने...
आता फिरने ना, फिरने माघारी
करून तयारी वाजवा हो तुतारी


नवरी नी नवऱ्याची स्वारी
नांदते संसारी घेऊन तलवारी, हा-हा
नवरी नी नवऱ्याची स्वारी
नांदते संसारी घेऊन तलवारी

असेच भांडण जरी मी हंगम
मठाय संगम असे पुढे
प्रेमे आलिंगन, आनंदे मिलन
विवाह बंधन हेच खरे

विवाह बंधन हेच खरे
विवाह बंधन हेच खरे
शुभ मंगल सावधान

Songtext kommentieren

Log dich ein um einen Eintrag zu schreiben.
Schreibe den ersten Kommentar!

Quiz
„Grenade“ ist von welchem Künstler?

Fans

»Navri Ni Navryachi Swari« gefällt bisher niemandem.